सवाल हिंदुत्वाचा...

Foto
शिवसेनेचे पिछे मूड तर मनसेचे आगे बढ!
अयोध्येत झालेल्या रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष करण्यासाठी शहरात भाजप मनसेत राजकीय चढाओढ दिसून आली. तर सत्तेच्या कात्रीत अडकलेल्या शिवसेनेला राम मंदिर भूमिपूजनाचा जल्लोष करताच आला नाही. मनसेने मात्र अटकेपार झेंडे लावत लक्ष वेधून घेतले. भाजपसह हिंदुत्ववादी  संघटनांनीही शहरात राम भक्तीची ज्योत चेतवली.  तरी चर्चा आहे ती शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेची! 
स्वातंत्र्यानंतरचे देशातले सर्वात मोठे आंदोलन अशी गणना राम जन्मभूमि आंदोलनाची केली जाते. रथयात्रा आणि कारसेवेमुळे  भाजपला सत्तेचे सोपान सर करता आले हाही इतिहास आहे. गेल्या दोन तीन चार दशकात राम मंदिराचा मुद्दा सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला. अनेक सरकारे घडली अन पडलीही ! याच भावनात्मक मुद्द्यावरून काल शहरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण दिसून आले. विशेषतः राम मंदिरासाठी  जिवाची बाजी लावणार्‍या शिवसैनिकांची अस्वस्थता  नजरेत भरणारी होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही  हिंदुत्वचा जल्लोष करण्याची संधी आम्ही गमावली, अशी भावना अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवली. सत्तेच्या कात्रत सापडलेल्या शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला दुखावून चालणार नव्हते. त्यामुळे  कोरोना संकटाला पुढे करीत शिवसैनिकांचे हात बांधण्यात आले, असा आरोप  दबक्या आवाजात होत आहे. एकंदरीत राम मंदिराच्या मुद्द्यावरून घ्यावी लागलेली पिछे मूडची भूमिका शिवसैनिकांना अस्वस्थ करणारी ठरली.
मनसेचे आगे बढ...
शिवसेनेने राम पूजनाचे कार्यक्रम रद्द केले असताना मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या मुद्द्यावरून आगे बढो ची भूमिका घेतली. मनसैनिकांनी टीव्ही सेंटर चौकात जल्लोषाची तयारी करताच पोलिसांनी त्यांना अटकाव केला. कायद्याचा बडगा उगारत मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या वर्षभरात कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख बनवण्याच्या तयारीत असलेल्या मनसेला ही नामी संधी चालून आली होती.. त्याचा कार्यकर्त्यांनी पुरेपूर लाभ घेतला. जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अटक करुन घेत शहरवासीयांचे लक्ष वेधले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker